
अंबाजोगाई – 26 जुलै कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष मेजर एस पी कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य भागवत मसणे तर सूत्रसंचालन दत्ताजी बनसोडे यांनी केले. तर प्रास्ताविक संतोष चौधरी आणि आभार प्रदर्शन वैभव चौसाळकर यांनी केले. अंबाजोगाई लगतच निजामकालीन फायरिंग ची टेकडी आहे. या टेकडीस शहीद टेकडी म्हणतात. त्या टेकडीवर वृक्षारोपण करून ,बिया रोपण करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी सात वाजता घेण्यात आला. योगेश्वरीच्या दहावीच्या मुलांनी सैनिकांना मानवंदना देण्यासाठी कारगिल युद्धात 530 जवान शहीद झाले, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 530 सीडबॉल तयार करून त्याचे रोपण या टेकडीवर करण्यात आले. या टेकडीवर लाखो बुलेट चे गोळे पडले आज त्याच टेकडीवर वृक्षांच्या बियांची गोळे पडले. प्रत्येक शहिदांच्या नावे हा बीज रुपी गोळीबार करण्यात आला. ही लढाई डोंगराळ भागात लढलेली त्यामुळे डोंगरावर वृक्षरोपी मानवंदना देण्यात आली. मेजर एस पी कुलकर्णी म्हणाले आज पर्यंत जेवढ्या लढाया झाल्या त्या सगळ्यांपेक्षा उंच टेकडीवर लढलेली ही लढाई आहे. भारतीय सैनिकांच्या पराकोटीच्या राष्ट्रभक्ती मुळे हा विजय झालेला आहे. या युद्धात स्थळसेना, वायुसेना, नौदल यांच्या योग्य नियोजनामुळे व अत्यंत उत्कृष्ठ व्यवस्थापनामुळे ही लढाई जिंकल्या गेली. शत्रू उंच टेकड्यांवर व आपले जवान जमिनीवर पण केवळ इच्छाशक्ती व राष्ट्रभक्ती मुळे एवढी अवघड लढाई आपल्या सैन्याने जिंकली. या लढाई मध्ये बोफोर्स तोफानी प्रचंड काम केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भागवत मसणे यांनी कवितेच्या माध्यमातून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व जय हिंद ग्रुप मधील मुला मुलींमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी,युवकांना जल,जमीन, जंगल याविषयी अंतिरिक जिव्हाळा निर्माण व्हावा. यासाठी हा उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पाटील, राहुल घाडगे व विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.