अंबाजोगाई प्रतिनिधी:-गोविंदा आला रे या जयघोषात जय मल्हार गणेश मंडळाच्या गोविंदा पथकाने फोडल्या दहीहंडी फोडली शहरातील श्री.शंकर महाराज वंजारी वस्तीगृह येथे राजकुमार (बाळा) गायके मित्र परिवारांच्या वतीने भव्य एकता दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, गेल्या दहा वर्षापासून अंबाजोगाई शहरात बाळा गायके मित्र परिवारांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या गोविंद पथकाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता, गोविंदा आला रे या जयघोषात गाण्याच्या तालावर युवकांनी चार ते पाच थराचे मानवी मनोरे लावत दहीहंडी फोडली,
या कार्यक्रमाची सुरुवात युवानेते अक्षय मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे, शहर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, मा.भाजपा जिल्हाध्यक्ष नीलकंठ चाटे, हृदयरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.अमोल दहिफळे व दै.बीड सुपरफास्टचे संपादक अतुल जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर, मा.नगराध्यक्ष महादू मस्के, जेष्ठनेते हिंदूलाल काकडे, भाजपा तालुकाध्यक्ष शिरीष मुकडे, शहराध्यक्ष संजय गंभीरे, डॉ.निशिकांत पाचेगावकर यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार बाळा गायके यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण भालेकर यांनी मानले आहेत, दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाळा गायके मित्र परिवार यांनी प्रयत्न केले. दहीहंडी पाहण्यासाठी शहरातील युवकांची महिलासह, बालगोपाळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दहीहंडी कार्यक्रमास कलावंतांची उपस्थिती
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक राजन सरवदे, गायक तुकाराम सुवर्णकार, लावणी कलाकार श्वेता औवसौरमोल, सुप्रिया पुणेकर, स्थानिक कलाकार गीता उकरे, वैष्णवी राठोड आदी कलावंतांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
