भाविक भक्तांनी लाभ घ्यावा – मधुकर सुरवसे यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
श्री संत सेना महाराज यांच्या ६२६ व्या पुण्यतिथीनिमित्त अंबाजोगाई येथे बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रींचा अभिषेक व महापुजा, महाआरती, किर्तन, भक्तीगीत गायन आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्त, सर्व समाज बांधवांनी पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मधुकर सुरवसे यांनी केले आहे.
शहरातील श्री संत सेना महाराज व श्री संत नरहरी महाराज मंदिर, मुकुंदराज रोड, अंबाजोगाई येथे बुधवार, दि.२० ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ९ वाजता या वेळेत श्रीहरी (मामा) गवळी व माणिकराव (मामा) राऊत, विष्णु कचरे, पांडुरंग कचरे, विष्णु शिंदे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा होईल. सकाळी १० ते १२ वाजता या वेळेत ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड (श्री.जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपुर) यांचे किर्तन होईल. किर्तन व भजनाचे मानकरी प्रा.विजयकुमार बिदरकर, भिमराव बाबुराव कचरे हे आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते दुपारी २ वाजता या वेळेत सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप यांचा भक्तीगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री संत सेना महाराज प्रतिष्ठाण, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, अंबाजोगाई आणि मधुकर सुरवसे, जिवराज मोरे, भिमराव कचरे, परमेश्वर गवळी, संतोष गवळी, अजिंक्य राऊत, अभिनय सुरवसे, राजकुमार जाधव, डॉ.केशवराव राऊत, संभाजी राऊत, नवनाथ राऊत, अभिराज गवळी, नरसिंग वाटकर, गोविंद (दादा) चोपडे, कविराज (दादा) कचरे आणि कारागीर युनियनचे अध्यक्ष माधव कांबळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे.
=======================
