४ ते ९ जानेवारी दरम्यान बालझुंबड अंतर्गत विविध स्पर्धा ; उपक्रमात शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग २६ व्या बालझुंबडचे आयोजन रविवार, दिनांक ०४ ते ०९ जानेवारी २०२६ या दरम्यान करण्यात आले आहे. बालझुंबड म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेहसंमेलन होय. हे या उपक्रमाचे २६ वे वर्ष आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना व एक सशक्त व्यासपीठ मिळते. यावर्षी बालझुंबडचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थी व बालझुंबडच्या विविध स्पर्धेतील माजी विजेते अभिषेक कोंडिराम चव्हाण आणि कु.नंदिनी संतोष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेव्हा अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी केले आहे.
मागील २५ वर्षांपासून प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाई शहरात अखंडीतपणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी बालझुंबड या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आले. प्रतिवर्षी तालुक्यातील १५० हून अधिक शाळा या उपक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात. तालुकास्तरीय बालझुंब्बड म्हणजे मुलांसाठी आयोजित केलेला एक सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रम किंवा महोत्सव असतो, जिथे मुलांना विविध कला, आविष्कार सादर करण्याची संधी मिळते. यात विविध स्पर्धांचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. हा उपक्रम अंबाजोगाईसारख्या ठिकाणी अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे, ज्यामुळे स्थानिक मुलांना एक सशक्त व्यासपीठ मिळते. त्यामुळे याही वर्षी तालुक्यातील सर्व शाळा यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली आहे. बालझुंबड हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजीत केला जात असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते नियोजन देखील त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. या उपक्रमातून अंबाजोगाई तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून संधी प्राप्त होत आहे. क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या तयारीत असून हा उपक्रम अतिशय शिस्तबध्द व नियोजनबद्ध रीतीने आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा ही स्पर्धेचे वैशिष्टयपुर्ण नियोजन करून तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. यावर्षी रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बालझुंबडचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थी व बालझुंबडच्या विविध स्पर्धेतील माजी विजेते अभिषेक कोंडिराम चव्हाण आणि कु.नंदिनी संतोष अग्रवाल यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. अभिषेक चव्हाण हा बालझुंबड मधील चित्रकला आणि समुहनृत्य स्पर्धेचा माजी विजेता आहे. तर कु.नंदिनी अग्रवाल हि देखील रांगोळी, चित्रकला आणि समुहनृत्य स्पर्धेची यापूर्वी विजेती ठरलेली आहे. बालझुंबड-२०२६ या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ४ थी गटासाठी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा, वैयक्तीक नृत्य, समुह नृत्य, इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी पी.पी.टी. स्पर्धा (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कॉम्पिटेशन), प्रश्नमंजुषा स्पर्धा (क्विझ कॉम्पिटेशन), चित्रकला, वैयक्तीक नृत्य, समुहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी बालझुंबड हे खुले व्यासपीठ आहे. अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास १०० ते १५० शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळांच्या माध्यमातून सहभागी होतात. बालझुंबडच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो गुणी कलावंत, खेळाडू, चित्रकार, नर्तक, विविध क्षेत्रात यशस्वी, नामांकित व्यक्तीमत्व तयार झाले असून ते नाटक, सिनेमा, कला, संगीत तसेच क्रीडाविश्वाच्या माध्यमातून विविध खेळाडू व कलांच्याद्वारे आपली छाप अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पाडत आहेत. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही अशा शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड ही केवळ एक स्पर्धा नसून ती एक पर्वणीच आहे. बालझुंबड हा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक स्नेह मेळावा, स्नेह संमेलन तथा आनंदोत्सवच ठरतो. यामध्ये सर्व स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. कारण, सर्व स्पर्धा तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत प्रवेश घेण्याचा व सहभागी होण्याचा अंतिम आज शनिवार, दिनांक ०३ जानेवारी २०२६ हा आहे. तेव्हा इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच आपल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा संयोजक यांचेशी संपर्क साधून तात्काळ आपला प्रवेश नोंदवावा. स्पर्धेच्या अधिक माहिती व प्रवेशासाठी स्पर्धेच्या अधिक माहिती व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी समन्वयक, बालझुंबड – २०२६, जोधाप्रसादजी माध्यमिक विद्यालय, गुरूवार पेठ, अंबाजोगाई येथे संपर्क साधावा व अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी, कार्यकारी संचालक संकेत मोदी तसेच समन्वयक राजेश कांबळे (९८६०३३७००८), मुख्याध्यापक आनंद टाकळकर (९८५०५९१०६१), विनायक मुंजे (९४२१३४१६८८) यांनी केले आहे.
=======================
