Skip to content
- Home
- सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अंबाजोगाईकरांचा पाठिंबा; पंतप्रधानांना निवेदनअंबाजोगाई | प्रतिनिधीनीट (NEET-UG) परीक्षा २०२६ मधील कथित पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची तातडीने दखल घेऊन ते सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट (NEET-UG) परीक्षेची प्रश्नपत्रिका राजस्थानमधून फुटल्याचे समोर आले होते. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी अभिजित दिपके यांच्या पुढाकारातून देशव्यापी आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सलग १६ दिवस उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असूनही केंद्र सरकारने अद्याप या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.सोनम वांगचुक हे देशाचे मौल्यवान व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर अमर हबीब, कालिदास आपेट, सुदर्शन रापतवार, धिमंत राष्ट्रपाल, अनिकेत लोहिया, अच्चुत गंगणे,बब्रुवान पोटभरे, ॲड. अजय बुरांडे, दगडू लोमटे, प्रा. शैलेजा बरुरे, प्रा. अरुंधती पाटील, ॲड. सुनील सौंदरमल, प्राचार्य कमलाकर कांबळे, प्रा. डी. जी. धाकडे, वसंतराव मोरे आणि ॲड. अनंत जगतकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.