सेवानिवृत्त एस.टी.कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – उपाध्यक्ष परमेश्वर करपे यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) एस.टी.सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, बीड विभागाच्या वतीने अंबाजोगाई येथे बुधवार, दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई बस स्थानकाचे समोर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे (पब्लिक क्लब) चे सभागृहात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस हेमंतराव कुलकर्णी (प्रादेशिक सचिव, मराठवाडा विभाग), शेर जमा खान (अध्यक्ष, बीड विभाग), रमेश महामुनी (सचिव, बीड विभाग) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीमध्ये ईपीएस – 2026 सुधारित बदल, सेवानिवृत्तांचे बारामाही मोफत पास, सेवानिवृत्तांचे एनसीएमसी कार्ड, एसटीचे ओळखपत्र, सेवानिवृत्तांचे एप्रिल – 2016 पासूनचे वाढीव वेतन वाढ व घरभाडे भत्ता फरकाबाबत सेवानिवृत्तांचे पेन्शन क्लेम, फॉर्म 10 – डी मंजुरी इत्यादीं बाबत तसेच मिनिमम पेन्शन वाढ व हायर पेन्शन बाबत उपस्थित न्यायालयीन लढाई बाबत सभासदांना माहिती देण्यात येईल. ही बैठक बीड विभागाची असल्याने सदर बैठकीस बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई व परळी येथील एस.टी.सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने आणि वेळेवर हजर रहावे तसेच इतर सेवानिवृत्त बांधवांना या बैठकीबाबत अवगत करावे असे आवाहन राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे बीड विभाग, शाखा अंबाजोगाईचे उपाध्यक्ष परमेश्वर करपे, अंकुशराव दाभाडे, गंगाधरराव नंदीकोले, सोनेराव गजाकोश, अच्युतराव करपे, मुकुंदराव कदम तसेच अंबाजोगाई कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.