17/04/2025
Spread the love

बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण देण्याची आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्याची मागणी

अंबाजोगाई – बांगला देशातील हिंदूवर होणारे हिंसक अत्याचार, देशात घडणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांच्या निषेधार्थ अंबाजोगाईत बुधवारी (दि.२८) प्रचंड मोठा हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी इविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.

बांगला देशातील हिंदूवर होणाऱ्या हिंसक अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यासह कोलकातामध्ये झालेल्या भगिनी अत्याचार व हत्या प्रकरण व ऊरण मधील भगीनीची लव्ह जिहाद अत्याचार व हत्या तसेच अरविंद वैद्य याची जिहादी वृत्तीने केलेली हत्याच्या निषेधार्थ अंबाजोगाईते सकाळ हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यंसह व्य्पारी, सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरु होऊन हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बांग्लादेशसह संपूर्ण भारतात विशिष्ट समुहाकडून हिंदु माता भगिनीवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना / अमानुष हत्या, मंदिराची तोड फोड व विटंबना तसेच देशात चालु असलेल्या लव्ह जिहाद, गोहत्या, साधु संतांवरील अत्याचार, जमीन जिहाद तसेच शिवछत्रपतीच्या गडकिल्यावर होणारे अतिक्रमण, कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानुषपणे झालेला अत्याचार, तसेच बदलापुर येथे झालेला बालवयीन मुलीवर झालेले अत्याचार, व उरण येथील यशश्री शिंदे हीची जिहादी मानसिकतेने केलेले बलत्कार व हत्या, धारावी येथील अरविंद वैद्य यांची अमानुष हत्या, मालवण येथील शिवछत्रपतीचं स्मारक ज्या ठेकेदारानी बोगस काम करून बनवले त्या पीडब्युडी अभियंता सहित चौकशी लावावी व योग्य ती कारवाई करावी. तसेच, बांगलादेशमधील हिंदु बांधव यांना सुरक्षा द्यावी व त्यांना मायदेशीत स्विकारावे व त्यांचे पुनर्वसन करावे व भारतात राहणारे सर्व बांगलादेशी रोहिग्या यांना पोलीस यंत्रनाने शोध घेऊन त्यांना देशाबाहेर हाकलुन द्यावे आदी मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. या सर्व मागण्यांना राज्य व केंद्र शासनाने गंभीरतेने घ्यावे अन्यथा जनतेच्या आक्रोशाला याहूनही मोठ्या स्वरूपात सामोरे जावे लागेल असा इशारा अंबाजोगाई येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांतेत हा मोर्चा पार पडला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवरहरत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.