
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : पालात राहणारे गोरगरीब कुटुंब हक्काच्या निवा-यासाठी रस्त्यावर उतरले. घरकुल मंजूर करून गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी शुक्रवारी शासनाकडे केली आहे.
अतिशय गरीब परिस्थितीतील कुटुंबांना हक्काचे व कायमस्वरूपी घरकुल नाहीत. छोटा, मोठा व्यवसाय करून प्रपंच चालवून पोट भरत असलेल्या व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने ते पाल ठोकून आपले जीवन जगत आहेत. शासनाने अशा व्यक्तींना कायमचा निवारा द्यावा अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीचे प्रमुख ब्रबुवाहन पोटभरे यांनी शुक्रवार, दि.३० ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अंबाजोगाई शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून काही भटके विमुक्त लोक सरकारी जागेत, रस्त्यालगत वास्तव्य करून राहातात. सर्वांना घरे या योजनेचा फायदा अद्याप यांना झालेला नाही. शासनाने जर हक्काचा निवारा दिला तर यांच्या मुला बाळांच्या जीवनास स्थैर्य येईल. मांग वडगावचे पारधी ही पालात राहतात, त्यांच्या आजोबा वडील व चुलते यांचे निघृण खुन त्या गावात झाले. पण, या पारधी लोकांचे सरकारने पुरार्वसन केले नाही. पालात राहणारे काही लोकांकडे अंबाजोगाईचे आधारकार्ड, विद्युत मीटर, मतदान यादीत नावे आहेत, तरी ही या लोकांना मूलभूत अशा कोणत्याही सुविधा नाहीत, नगरपरिषद प्रशासनाने सदरील कुटुंबाच्या वास्तव्याची प्रत्यक्ष पाहणी करून घरकुलांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना द्याव्यात. अथवा पुढील आंदोलन उग्र अशा स्वरूपाचे राहील.असा इशारा काॅ.पोटभरे यांनी दिला आहे. निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटसरे,राजाराम कुसने,आशोक सोनवणे गुलेनाज बेगम, शेख बाबा, संतोष पवार, रोहिणी मस्के,अनिता रसाळ, बापु गोमसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.