17/04/2025
Spread the love

अंबाजोगाई /प्रतिनिधी अंबाजोगाई शहरातील उदयोन्मुख कलावंत युवा संगीतकार ओंकार रापतवार याने सातासमुद्रापार जात आपला कलाविष्कार सादर करून दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांनी कला रसिकांनी ओंकार व त्याच्या रंगरेजा समूहाला डोक्यावर घेतले. त्याबद्दल ओंकार रापतवार याचा जाहीर सत्कार तसेच स्व. मुकेशजी यांच्या मैफिलीचे आयोजन रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाजोगाई कलाकार कट्टा, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील कलाप्रेमी नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


अंबाजोगाई कलाकार कट्टा, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील कलाप्रेमी नागरिकांना वर्षभर विविध कार्यक्रमांची मेजवानी दिली जाणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाजोगाई शहरातील उदयोन्मुख कलावंत, युवा संगीतकार ओंकार सत्येदू रापतवार व समूहाने नुकतीच दक्षिण आफ्रिकावारी केली आहे.आपल्या शहरातील या तरुण कलावंतांचे आफ्रिकन नागरिकांनी कौतुक करून त्याच्या कलाविष्काराचे कौतुक केले आहे.अशा या गुनीजन कलावंतांचा गौरव सोहळा गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. श्रीनिवास रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य व पत्रकार अनिलजी महाजन, हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, प्रशांत लाटकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या प्रसंगी अंबाजोगाई करांच्यावतीने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन ओंकार रापतवार याचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच सत्कार कार्यक्रमानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय कलावंत स्व. मुकेशजी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील कलावंतांची गीत मैफिल संपन्न होणार आहे. स्व. मुकेशजी यांचे विविध गाणे या ठिकाणी ऐकावयास मिळणार आहेत.तरी या दोन्ही कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अंबाजोगाई कलाकार कट्टाचे संस्थापक अध्यक्ष तालमार्तंड प्रकाश बोरगावकर,परमेश्वर गीते, माजी नगराध्यक्ष महादू मस्के अनंत अरसुडे व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.