
२९ बालकांवर मुंबईत होणार मोफत -हदय शस्त्रक्रिया
मुंबईचे प्रसिद्ध डॉ. भूषण चव्हाण,डॉ. नवनाथ घुगे व पथकाने केल्या तपासण्या
अंबाजोगाई -: ज्या बालकांना जन्मताच, हृदया ला छिद्र असणे, एखादी हृदयाची झडप छोटी असणे, एएसडी,व्हीएसडी ,पीएडी, तसेच
हृदयरोग व इतर आजार होते. अश्या २४० बालकांचा शोध घेत त्यांची हृदयरोग, टू – डी इको व कलर डॉपलर तपासणी मोफत करण्यात आली . या तपासणीत
२९ बालकांना गंभीर आजार असल्याचे आढळले. त्या बालकांवर मुंबईत होणार मोफत -हदय शस्त्रक्रिया होणार आहे. अशी माहिती
मुंबईचे प्रसिद्ध डॉ. भूषण चव्हाण,हृदयरोग तज्ञ डॉ नवनाथ घुगे यांनी दिली.
रविवारी अंबाजोगाई येथील घुगे हार्ट क्रिटीकल केअर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आय.एम ए. अंबाजोगाई, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम महाराष्ट्र शासन व बालाजी हॉस्पिटल, मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरात प्रथमच लहान मुलांचे हृदयरोग, टू-डी इको,कलर डॉपलर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात मुंबई येथील प्रसिद्ध नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ.भूषण चव्हाण, डॉ.नवनाथ घुगे यांनी बालकांच्या हृदयाची तपासणी करून निदान व उपचार केले. यावेळी २४० बालकांची तपासणी करण्यात आली. यात २९ बालकांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे,सचिव धनराज सोळंकी,डॉ. निशिकांत पाचेगावकर,बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ.सुधीर धर्मपात्रे, सुरेश मोदी,सचिन बेंबडे, राजेंद्र घोडके ,ओंकेश दहीफळे,अजित देशमुख,गणेश राऊत,विश्वनाथ लहाने, आनंद शिरसाट,रमेश देशमुख,संभाजी बुरर्गे,अमित गिरवलकर,डॉ.महेंद्र लोमटे,डॉ.प्रदीप देशमुख,डॉ.पांडुरंग बोंद्रे,डॉ.कमलाकर साखरे,डॉ.राहुल वरोडे,डॉ.मोहेकर,डॉ.बारहते,डॉ. जावळे,डॉ.काशीद
यांची उपस्थिती होती.
या शिबियाच्या यशस्वितेसाठी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक आर.बडे ,.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन शेकडे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर.तांदळे यांनी मार्गदर्शन केले.
अंबाजोगाई शहरात प्रथमच असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी महिला व पुरुष यांचे हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली. मात्र सध्याच्या काळात वातावरणातील बदल आणि आहार विहाराच्या बदलत्या सवयीमुळे बालकांच्या हृदयावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी घुगे हॉस्पिटल अंबाजोगाई,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासन, आय. एम. ए अंबाजोगाई आणि बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
२९ बालकांची हृदयरोगातून होणार मुक्तता -:
खाजगी रुग्णालयात टू डी इको व कलर डोपलर साठी साधारणतः एक हजार रुपये खर्च येतो. तसेच लहान बाळांच्या एका ऑपेरेशन साठी ३ ते ४ लाख रुपये लागतात. या शिबिरात २९ बालकावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. व ही बालके हृदय रोगातून कायम मुक्त होणार आहेत. अशी माहिती डॉ नवनाथ घुगे यांनी दिली.