
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार यांचे आशीर्वाद घेतले
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केज मतदारसंघ मागील काही दिवसांपासून पिंजून काढला आहे. जनसंपर्क दौऱ्यातून त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, महिला यांच्याशी संपर्क करून संवाद साधला आशीर्वाद घेतले.
केज विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क दौऱ्यानिमित्त डॉ.अंजलीताई घाडगे यांनी ‘आधार मल्टीस्टेटच्या अंबाजोगाई’ येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक यांनी ताईंचा सत्कार केला आणि आपल्या बँकेविषयी तसेच बँक मधील कर्मचारी आणि व्यवस्थापन तसेच कामकाज याविषयी माहिती दिली. तसेच बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच अंबाजोगाई येथील आराध्या मोबाईल्स ऍंड ॲक्सेसरीज, तथागत चौक या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी भेट देऊन प्रोप्रा.अजय गोविंद जामदार यांना व्यवसायातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी बोलत असताना आजच्या युवकांनी उद्योग आणि व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाचे, आपल्या गावाचे आणि अप्रत्यक्षरीत्या आपल्या देशाचा विकास साधावा असे प्रतिपादन डॉ.घाडगे यांनी केले. तर केज मतदारसंघातील भाटुंबा येथे कै.भीमराव शंकरराव धपाटे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.श्री.सुरेश महाराज वारके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गावातील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी उपस्थित राहून श्री. शंकर धपाटे, गणेश धपाटे, मोहन धपाटे आणि परिवाराशी संवाद साधला. यावेळी गावातील नागरिक तसेच धपाटे परिवाराशी संबंधित नातेवाईक आणि मित्र, परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. जनसंपर्क दौऱ्यानिमित्त डॉ.अंजलीताई यांनी भिमाई नगर, अंबाजोगाई या ठिकाणी भेट दिली. या भागातील सध्याचे प्रश्न तसेच आरोग्यविषयक समस्यांविषयी स्थानिकांशी चर्चा केली आणि ते लवकरात लवकर सोडवू असे उपस्थितांना आश्वासन दिले. यावेळी या भागातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच काय तर डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केज मतदारसंघ मागील काही दिवसांपासून पिंजून काढला आहे. जनसंपर्क दौऱ्यातून त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, महिला यांच्याशी संपर्क करून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या व सकारात्मक संवाद साधून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. एक विकासाभिमुख, आश्वासक चेहरा म्हणून केज विधानसभा मतदारसंघातील जनता डॉ.अंजलीताई घाडगे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
=======================