अंबाजोगाई/प्रतिनिधी:
येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पंतसंस्थेतील 6 कोटी 10 लाख 563 रुपयांचा झालेल्या अपहार व गैरव्यव्हार प्रकरणातील अटक आरोपीचे जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 03 ऑक्टोबर 2024 रोजी फेटाळला आहे.
तालुक्यातील शिक्षकांच्या आर्थीक हितासाठी सुरु करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पंतसंस्थेत 2012 ते 2016 या कालावधीत 6 कोटी 10 लाख 563 रुपयांचा गैव्यवहार व अपहार झाला होता. याबाबत 14/08/2024 रोजी अंबाजोगाई शहर पोलिस ठण्यात पतसंस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ, कर्मचारी व डी. सी. सी. बँक शाखा अंबाजोगाई येथील तत्कालीन कर्मचारी अशा एकूण 27 आरोपींवर गुन्हा नोंद झालेला आहे. या आर्थीक घोटाळ्याचे गांभीर्य ओळखून सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्या कडे वर्ग झाला. सदर गुन्हाच्या तपासा दरम्यान पतसंस्थेतील कर्मचारी रामभाऊ विश्वनाथ भगत यास अटक करण्यात आली. सदर आरोपींने जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जमीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान सदर पतसंस्थेतील पीडितांच्या वतीने सदर जामीन अर्जास वकीला मार्फत विरोध करण्यात आला. जामीन अर्जावर दि. 03 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश दिपक खोचे यांच्या समोर झाली असता त्यांनी अटक आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. सदर पतसंस्थेतील पीडितांचे वतीने ॲड. आर. एस. डिघोळे, ॲड. एस. आर. मुंडे यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड. एम. बी. आदमाने व ॲड. बी. ए. निंबाळकर यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर गुन्हातील इतर काही आरोपींनी अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला असून सदर आरोपी अद्यापही फरार आहेत. सदरचे प्रकरण गंभीर आर्थिक गुन्हाचे असल्याने त्याकडे संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांचे व नागरीकांचे लक्ष लागले आहे.