26/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदारसंघ हा कायम कॉंग्रेस व शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या उमेदवाराचा बालेकिल्ला राहीलेला आहे. १९९५ नंतर भाजपाला मतदानरूपाने कायम साथ देणारी अनेक गावे केजमध्ये तयार झाली. भाजपाचे पारंपरिक मतदार असलेल्या या प‌ट्ट्यात सध्या बदलाची हवा दिसून येत आहे. डॉ.अंजलीताईंना सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सध्या प्रत्येक गावातील माता – भगीनींकडून डॉ.अंजलीताई यांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. यावरून केजमध्ये यावेळी परिवर्तन होऊन डॉ.अंजलीताई यांच्या माध्यमातून तुतारी वाजणार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ.घाडगे यांनी केज विधानसभा मतदारसंघात गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेत अहोरात्र त्या फिरत आहेत. त्यांना गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मंगळवार, दि.८ ऑक्टोबर रोजी त्यांनी तांदळ्याची वाडी व इतरही गावांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांनी त्यांचे‌ जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर त्यांची अनेक गावातून भव्य अशी मिरवणूक काढली जात आहे. तसेच महिला भगिनी डॉ.अंजलीताई यांचे औक्षण करून त्यांना यशस्वी भवः असा आशीर्वाद देत आहेत. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या भव्य सत्कारांनी डॉ.अंजलीताई भारवल्या आहेत, सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत होत आहे.

डॉ.अंजलीताईंचा बोलबाला :

डॉ.अंजलीताई घाडगे यांचे वडील रामभाऊ घाडगे हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर होते. त्यांनी एकदा विधानसभेची निवडणूक ही लढविली होती. तसेच डॉ.अंजलीताई यांनी स्वतः काँग्रेस पक्षाकडून कोणती ही पूर्वतयारी नसताना अवघ्या पंधरा दिवसांत सर्व तयारी करून विधानसभा लढविली आणि चांगले मतदान घेतले आहे. त्यांचे सर्व कुटुंबीय हे उच्चशिक्षित, उच्च विद्याविभूषित असून या कुटुंबातील अनेक जण प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. घाडगे कुटुंबियांना सामाजिक कार्याची आवड आहे. सर्वत्र मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादावरून तरी सध्या केज मतदारसंघात डॉ.अंजलीताईंचा बोलबाला दिसून येत आहे.

=======================

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.