26/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत माता श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव हा दि ३ ऑक्टोबर ते१२ ऑक्टोबर यादरम्यान संपन्न होत आहे. शुक्रवार दि ११ रोजी म्हणजेच नवमीच्या दिवशी जिल्हाधिकारी श्री व सौ अविनाश पाठक यांच्या हस्ते विधिवत पूजा,होमहवन होऊन पूर्णाहुती देण्यात आली. शनिवार दि १२ रोजी दसऱ्यानिमित्ताने माता श्री योगेश्वरी देवीचा सीमोल्लंघन पालखी सोहळा संपन्न होणार आहे . देवीच्या या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे. देवीची पालखी शनिवारी दुपारी १वाजता मंदिरातून निघून प्रतिवर्षी ठरलेल्या नियोजित मार्गावरून सीमोल्लंघनास निघणार असल्याचे देखील राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
देवीच्या नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक जगविख्यात ख्याती प्राप्त कलाकारांनी मंदिर परिसरात येऊन आपली कला सादर केली. यामध्ये प्रामुख्याने भरत नाट्य, गायन , वादन यांचा समावेश असून विविध भजनी मंडळ यांच्याकडून देखील भजन, कीर्तन , प्रवचन तथा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाचा आनंद व आस्वाद येथील देवीच्या भक्तगणांनी घेतला. याच प्रकारचा आनंद देवीच्या सीमोल्लंघनानिमित्ताने निघणाऱ्या देवीच्या पालखी सोहळ्यात देखील सहभागी व्हावे असे आवाहन राजकिशोर मोदी केले आहे.
भाविकांनी नवरात्र उत्सवात ज्या प्रमाणे शिस्त व शांतता पाळून मंदिर प्रशासनास सहकार्य केले त्याचप्रमाणे देवीच्या या पालखी सोहळ्यात देखील सहकार्य करावे आणि आपल्या दसरा या अतिशय पवित्र अशा सणाचा व देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्यात प्रेमरूपी सोने चांदी लुटत आपल्या मित्रपरिवार व कुटुंबियांसोबत आनंद घ्यावा अशी विनंती देखील देवल कमिटीचे उपाध्यक्ष राजकीशोर मोदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.