
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. प्रचार देखील वेग धरू लागल्याचे दिसून दिसून येत आहे. आपापल्या विचारांच्या उमेदवारास विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या जाहीर पाठिंबा देत आहेत. अशातच केज विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना देखील अनेक स्तरातून पाठिंबा दिला जातो आहे.नुकताच आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती नगिनाताई सोमनाथ कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जातीवादी प्रतिगामी विचारांच्या पक्षांना थांबविण्यासाठी आणि पुरोगामी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामार्फत “घटक पक्ष” म्हणून महाविकास आघाडीत सामील झालेल आहेत. त्यानुसार केज विधानसभा क्षेत्रात संघटना आपल्या संपूर्ण शक्तीनिशी सहकार्य करून आपणास या निवडणुकीत निवडून आणण्यास कटिबद्ध असल्याचे पत्र पृथ्वीराज साठे यांना दिले आहे.
त्याचबरोबर शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानरावजी वैराट व अरुणाताई तागडे महाराष्ट्र संघटक यांच्या आदेशाने आज दिनांक १३ रोजी पृथ्वीराज साठे यांना जाहिर पांठिबा दिल्याचे पत्र देण्यात आले. या पत्रावर जिल्हाध्यक्ष भिमा बध्दू पवार,
बापुराव भोसले, नाना वजारे
अविनाश वजारे, विजय वजारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.