
नेकनूर | ७ एप्रिल २०२५ – शासकीय अध्यापक विद्यालय, नेकनूर येथे प्राध्यापक पट्टेवाड सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम D.El.Ed.च्या विद्यार्थ्यांच्या व कॉलेजच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. अब्दुल नजीब सर, प्राध्यापक संदीप धोंडगे सर, तसेच शेंडगे मॅडम उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून पट्टेवाड सरांची पत्नी व काळे सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी पट्टेवाड सरांना शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. सरांनी आपल्या सेवाकाळातील आठवणी शेअर केल्या व विद्यार्थ्यांसाठी एक भावस्पर्शी गीत सादर केले. हे गाणे सादर करताना सर भावूक झाले होते.
कार्यक्रम वातावरणात एक वेगळाच उर्जा व भावनिक रंग भरला होता. सरांचा साधेपणा, विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि त्यांच्या शिक्षणातील योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.