
समारंभास उपस्थित रहाण्याचे आयोजकांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दलित युवक आघाडीचे लढाऊ शिलेदार, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त प्रा.एस.के.जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील ‘सम्यक पांथस्थ आबा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. ८ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील विलासराव देशमुख न.प. सभागृह, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गौरवग्रंथ प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश खुरसाळे (माजी अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई.) तर गौरवग्रंथाचे विमोचन ज.वि.पवार (ज्येष्ठ विचारवंत व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, मुंबई.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच गौरवग्रंथावर भाष्यकार म्हणून प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर (प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, छत्रपती संभाजीनगर.), प्रा.पी.जी.जोगदंड (माजी सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, मुंबई.) आणि मंगलताई खिंवसरा (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, छत्रपती संभाजीनगर.) हे आपले मौलिक विचार व्यक्त करणार आहेत. प्रा.एस.के.जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील ‘सम्यक पांथस्थ आबा’ या गौरवग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम तज्ज्ञ प्रा.जयदेव डोळे, मंगलताई खिंवसरा, प्रा.नानासाहेब गाठाळ, लंकेश वेडे, मुक्त पत्रकार अमर हबीब, डॉ.वाल्मिक सरवदे, सुरेश पाटील, राम दोतोंडे यांनी केले आहे. तर गौरवग्रंथ समिती मध्ये ज.वि.पवार, शांताराम पंदेरे, डॉ.सुरेश खुरसाळे, डॉ.साहेबराव गाठाळ, अण्णा खंदारे, अशोक देशमुख, चंद्रशेखर बर्दापूरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव प्राचार्य डी.ए.चव्हाण, सुखदेव भुंबे, उपप्राचार्य गौतम गायकवाड, डॉ.नरेंद्र काळे, प्रा.अरूंधती पाटील, प्रा.माणिक कांबळे, रमेशभाई खंडागळे, रामभाऊ पेरकर या मान्यवरांचा समावेश आहे. तरी गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभास आवर्जुन उपस्थित राहावे अशी विनंती व आवाहन प्रा.डॉ.चेतन सरवदे, चेतन पब्लिकेशन्स, सुधाताई जोगदंड, उत्तम जोगदंड, ऍड.विशाल जोगदंड, समीर मोरे यांनी केले आहे.
पूर्वतयारी संदर्भात बैठकीचे आयोजन :
गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभाच्या आयोजनाच्या पूर्वतयारी संदर्भात ‘अंबारी’ शासकीय विश्रामगृहात बुधवार, दिनांक ४ जुन रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक लंकेश वेडे यांनी भुषविले. तर या बैठकीस सुखदेव भुंबे, प्रा.डॉ.शंकर वाघमारे, एम.वाय.काळे, संभाजीराव सोनवणे, प्रा.संभाजीराव बनसोडे, व्यंकटराव वेडे, ऍड.वसंतराव हजारे, शशिकांत सोनकांबळे, प्रा.एम.बी.चव्हाण, डॉ.किरण चक्रे, ऍड.डी.आर.गोरे, उत्तम जोगदंड, दिलीप वैद्य, संजय भोसले, ऍड.विशाल जोगदंड, कल्याण जोगदंड, ऍड.ए.एस.धाईजे, प्रसेनजीत मस्के, संदिपान पोटभरे हे उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ.किरण चक्रे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुखदेव भुंबे यांनी मानले. सदरील बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. अशी माहिती माजी मुख्याध्यापक लंकेश वेडे यांनी दिली आहे.