24/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रमोद महाजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज शुक्रवार, दिनांक ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शुक्रवार, दिनांक ६ जुन रोजी सकाळी १० वाजता प्रमोद महाजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई येथे शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बिपिनदादा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख वक्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ते गुरूगोविंद सोन्नर हे ‘स्वदेशी विचारांचा प्रसार’ या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री ना.मंगल प्रभात लोढा मंत्री यांची आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य पी.के.मुने, गटनिदेशक श्रीमती एस.ए.क्षीरसागर आणि शिल्प निदेशक रामदास वैरागे, शिल्प निदेशक श्रीमंत ओव्हाळ यांनी पुढाकार घेवून योगदान दिले आहे. तसेच या उपक्रमात सर्व निदेशक व कर्मचारीवृंद सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.