23/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत रविवार, दिनांक १५ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गुणवंतांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खास आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा ठरवून त्यातून यशस्वी व्यक्तिमत्व बनविण्यासाठी आवश्य उपस्थित रहा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इयत्ता १० वी, १२ वी, पदविका व पदवीनंतर पुढे काय ? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. अशावेळी आपल्या पाल्याला व आपल्या स्वतःला जर निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले तर किती बरे होईल. म्हणून हाच विधायक हेतू व सकारात्मक विचार करून नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत रविवार, दिनांक १५ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण सर्वंकष कामगिरी करीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदिप रोडे सर (संस्थापक, नालंदा फांऊडेशन, बीड.) हे असणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशासकीय सेवेत ज्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लोकहिताला नेहमीच प्राधान्य दिले असे प्रशासकीय अधिकारी रविंद्र जोगदंड (वर्ग – १ उपायुक्त स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर.) व दिपक वजाळे (वर्ग – १ उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई.) आणि प्रभावी करिअर मार्गदर्शक म्हणून सर नागेश जोंधळे (संस्थापक, आई सेंटर प्रो तथा प्रेरणादायी वक्ते) तसेच यावेळी राजेंद्र घोडके (सामाजिक कार्यकर्ते), विधीज्ञ व कायदेशीर सल्लागार ॲड.राहुल बनसोडे (नाशिक) या मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी अंबाजोगाई शहर, परिसर आणि तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यवर यांनी खास आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा ठरवून त्यातून त्यांना यशस्वी व्यक्तिमत्व बनविण्यासाठी आवश्य उपस्थित रहावे. तसेच गुणवंत विद्यार्थी व पालकांनी नोंदणीसाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर तात्काळ संपर्क ( 9404643944‌ / 9975306156 ) साधावा असे आवाहन संयोजक, सर्व सन्माननीय सदस्य नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.