अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील टायगर ग्रुप परिवाराकडून पुन्हा एकदा बांधिलकी जोपासत अंबाजोगाई शहरात अन्नदान आणि चारा वाटप करण्यात आले.
हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करताना विविध गोष्टींवर भरमसाठ खर्च केला जातो. मात्र, या गोष्टींपेक्षा सामाजिक जाणीव ठेवत, समाजासाठी काहीतरी चांगले करून वाढदिवस साजरा करणे अधिक अर्थपूर्ण ठरते. येथील टायगर ग्रुप बीड जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीराम भाऊ पवार यांनी पुढाकार घेत टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव व मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथे विविध उपक्रम राबविले. यात स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय परिसरात अन्नदान व फळ वाटप केले. तसेच वृक्षारोपण करून आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आले. समाजामध्ये अशा विविध समाज घटकांना आधार देण्याचं काम टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर यांच्या संकल्पनेतून आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष राकेश अण्णा जाधव यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या प्रेरक कृतीचे सर्वस्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर, तिरूपती राठोड, दिपक लामतुरे, रूद्रा रूद्राक्ष, कोंडीराम पवार, राया धारेकर, योगेश जिरे, संतोष उजगरे, रोहन कुलकर्णी, कृष्णा नरसिंगे, सचिन कत्राळे व सचिन जाधव यांच्यासह टायगर ग्रुपचे सदस्य, मित्र परिवार उपस्थित होता.
