अंबाजोगाई (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून अवमान करणारांचा अंबाजोगाईत शिवप्रेमींकडून निदर्शन करून निषेध करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिवप्रेमींकडून उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना शिवप्रेमींनी सांगितले की, भोंदू स्वामी आनंद स्वरूप आणि बागेश्वर धामचा धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून जाणीवपूर्वक अपशब्द वापरून अवमान केल्याचा निषेध आम्ही गुरूवार, दिनांक ३० एप्रिल रोजी निदर्शन करून केला आहे. संघ आणि भाजप प्रणित भोंदू बाबा यांच्यामार्फत बहुजन समाजातील महापुरूषांची बदनामी करण्याचे कट कारस्थान या जातीयवादी सरकारच्या मार्फत सातत्याने करण्यात येत आहे. हेतूपुरस्सर महाराष्ट्र आणि देशातील शिवप्रेमींचा अवमान केला जात आहे. त्यामुळे भोंदू धीरेंद्र शास्त्री व स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करावी, त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमास महाराष्ट्रात परवानगी देऊ नये. असे अंबाजोगाई शहर व तालुक्यातील शिवप्रेमी व संविधानप्रेमी नागरिकांनी निवेदनातून विनंती केली आहे. यावेळी निवेदक बब्रुवाहन पोटभरे, भिमराव सरवदे, राजेश वाहुळे, अशोक पालके, रामकिसन मस्के, अंकुश ढोबळे, ऍड.प्रशांत पवार, नाना सरवदे, जीवन घाडगे, नवनाथ हारे, अशोक काळे पाटील, सुमित आवाडे, विशाल पोटभरे, अझहर सय्यद, दयानंद कांबळे, गंगाधर पौळ, शुभम तरकसे, कुंडलिक धायगुडे आदींसह अनेक शिवप्रेमी व संविधानप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.