नागपूर येथे नववे बौद्ध साहित्य संमेलनाचे ३ मे रविवार रोजी आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नववे बौद्ध साहित्य संमेलनाचे नागपूर येथे रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध साहित्य परिषद व नागपूर सिटी मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या संमेलनास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.कमलाकर कांबळे यांनी केले आहे.
या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नववे बौद्ध साहित्य संमेलनाचे संयोजक तथा बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.कमलाकर कांबळे यांनी सांगितले की, नववे बौद्ध साहित्य संमेलन हे रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर सिटी मल्टीस्टेट सभागृह, मेडिकल चौक, नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास उद्घाटक डॉ.अनिल हिरेखन (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), स्वागताध्यक्ष जितेंद्र वासनिक (संस्थापक चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट), संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश खरात (ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, नागपूर), मीनाताई ठाकरे (महापौर, नागपूर महानगरपालिका), संयोजक तथा बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.कमलाकर कांबळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. पहिले सत्र उदघाटनाचे असेल. या सत्रात प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे आपली भूमिका मांडतील. त्यानंतर स्वागताध्यक्ष जितेंद्र वासनिक, उद्घाटक डॉ.अनिल हिरेखन, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश खरात हे आपले समायोचित मनोगत व्यक्त करतील. या सत्राचे सूत्रसंचालन ऍड.सुनील सौंदरमल हे करतील. तर उपस्थितांचे आभार डॉ.शंकर वाघमारे हे मानतील. दुसरे सत्र परिसंवादाचे असेल, परिसंवादाचा विषय : पाली भाषा आणि बौद्ध संस्कृतीचे महत्व हा आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.निरज बोधी (विभागप्रमुख, पाली-प्राकृत विभाग, रा.तु.म.नागपूर विद्यापीठ) तर परिसंवाद सत्रात सहभागी वक्ते म्हणून प्राचार्य डॉ.सिद्धोधन कांबळे, डॉ.मोहन वानखडे, डॉ.रोझा मेश्राम, प्रा.डॉ.रूपेश कन्हाडे हे आपले विचार व्यक्त करतील. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.विकास सिडाम हे करतील. तर उपस्थितांचे आभार डॉ.राहुल धाकडे हे मानतील. या नंतर भोजन अवकाश असेल. यानंतर तिसरे सत्र कवी संमेलनाचे असेल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी इ.मो.नारनवरे हे असतील. तर यात सहभागी कवी म्हणून बाबासाहेब हिरवे, मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड, का.रा.वाल्देकर, रूपेश कन्हाडे, डॉ.सा.द.सोनसळे, हृदय चक्रधर, संजय गोडधाटे, माधुरी वसंत शोभा, प्रकाश राठोड, प्रसेनजित गायकवाड हे कवी आपल्या काव्यरचना सादर करतील. या सत्राचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर हे करतील आणि उपस्थितांचे आभार विजय राऊत हे मानतील. चौथे सत्र समारोपाचे असेल. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ.कमलाकर कांबळे हे भुषवतील. यावेळी डॉ.प्रदीप आगलावे (सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोप सत्रात मान्यवरांचा सत्कार, श्रोत्यांची मनोगते, संमेलनाध्यक्षांचे मनोगत, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होवून ठरावांचे वाचन प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे करतील. समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ.सा.द.सोनसळे हे करतील आणि उपस्थितांचे आभार प्रा.डी.जी.धाकडे हे मानतील. सामुहिक राष्ट्रगीताने नववे बौद्ध साहित्य संमेलनाची सांगता होईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष जितेंद्र वासनिक तसेच संयोजन समितीचे डॉ.शंकर वाघमारे, प्रा.डी.जी.धाकडे, डॉ.सिद्धोधन कांबळे, राजेंद्र सगर, राजेंद्र कांबळे, तातेराव जेठीथोर, डॉ.ज्ञानोबा सरवदे, डॉ.राहुल धाकडे, नरेशचंद्र मेश्राम यांनी पुढाकार घेतला आहे.
=====================
