विद्यार्थ्यांचे परिश्रम व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मागील २३ वर्षांपासून शंभर टक्के निकालाचे सातत्य – संस्थापक सचिव राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई संचलित मानव विकास निवासी मूकबधिर विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून यावर्षीही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची गेल्या २३ वर्षांपासूनची यशस्वी परंपरा २४ व्या वर्षी सुद्धा कायम राखली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण १४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पात्र ठरले होते व ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
मानव विकास निवासी मूकबधिर विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात यावर्षी शाळेचा निकाल एकूण शंभर टक्के लागला असून या निकालामध्ये ०२ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान तौफिक खमर चाऊस ७५.६० टक्के गुण प्राप्त करून पटकावला आहे व नवनाथ भागवत चौरे ७५ टक्के व प्रथमेश ज्ञानेश्वर रासमवाड ७३.६० टक्के गुण घेऊन द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व विषयाच्या जादा तासिका, साप्ताहिक, मासिक व सराव परीक्षांचा परिणाम म्हणून या निकालाचे सातत्य राखण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे .
विद्यार्थ्यांचे परिश्रम व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनमुळे शंभर टक्के निकालाचे सातत्य – सचिव राजकिशोर मोदी :
मागील २४ वर्षांपासून मानव विकास मूकबधिर विद्यालय आपल्या निकालाची यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जोपासत आहे. मानव विकास मूकबधिर विद्यालयात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक सोयी, सुविधा, अद्ययावत शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व पालकांसोबत असणारा योग्य समन्वय यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे सातत्य आहे. मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थी क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असावेत यासाठी संस्था कायम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी सांगितले. तर मूकबधिर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, विभागप्रमुख दिलीप साठे, डी.बी.शिंदे, एन.व्ही.बारस्कर, श्रीमती वर्षाराणी भालकीकर, भालचंद्र नांदुरकर आदींनी मार्गदर्शन केले. या निकालाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, सौ.डिंपल मोदी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील, वैसाका मार्गदर्शक अंकुशराव नखाते, संस्थेचे मार्गदर्शक प्रा.व्ही.बी.चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात, प्राचार्य बी.आय.खडकभावी, प्रख्यात कवी दिनकर जोशी, माजी मुख्याध्यापक सी.व्ही. गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.के.चव्हाण, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक इंद्रकुमार लोढा, जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मुंजे, घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या सोळुंके आदींनी सर्व विद्यार्थी, पालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तर सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मानव विकास मूकबधिर विद्यालयात मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू झालेले आहेत. तरी संबंधित पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी केले आहे.