विज्ञान शाखेतून कु.सिद्धि भूषण मोदी सर्वप्रथम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९२ टक्के एवढा तर इयत्ता १२ वी कला शाखेचा निकाल ८० टक्के एवढा लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान कु.सिद्धि भूषण मोदी व कला शाखेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान बुशरा इब्राहिम परसूवाले या विद्यार्थिनींनी पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी वर्गातून सर्वद्वितीय चि.वरद केंद्रे, तृतीय कु.जानकी जयस्वाल याप्रकारे विद्यार्थ्यांनी मान पटकावला आहे. तसेच कला शाखेतून सर्वद्वितीय सादिल मोहम्मद गवळी, सर्वतृतीय गायके रामेश्वरी चंद्रकांत या प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, मार्गदर्शक प्राचार्य बी.आय.खडकभावी, प्रा.व्ही.बी.चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात, माजी मुख्याध्यापक व प्राचार्य चंद्रकांत गायकवाड यांनी जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विनायक मुंजे, विभागप्रमुख नीना सोनवणे व सर्व प्राध्यापक वृंद यांचे अभिनंदन केले आहे. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे विशेष लक्ष आणि संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य यामुळे शक्य झाले असे मत प्राचार्य विनायक मुंजे यांनी व्यक्त केले. जोधाप्रसादजी मोदी उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी विद्यार्थी विज्ञान व कला शाखेमध्ये प्रवेश घेतात. आंबेजोगाई शहर व परिसरातून अनेक विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतात. या महाविद्यालयातून विद्यार्थी जेईई व नीट सारख्या परीक्षेत ही यशस्वी होतात. महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज मोफत सीईटी वर्ग घेण्यात येतात. यालाही विद्यार्थ्यांचा विशेष असा प्रतिसाद असतो. विविध सोयी सुविधांनी युक्त अशा जोधाप्रसादजी मोदी उच्च माध्यमिक विद्यालयामधून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच उल्लेखनीय आहे.
=====================
