पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार गायक सुभाष शेप यांचा गौरव
आधार मल्टीस्टेटचा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली व १०० कोटींच्या आतल्या गटामध्ये सलग १० वर्षांपासून प्रथम/ द्वितीय क्रमांक मिळवत असलेली तसेच मागील १३ वर्षांत विविध संस्थांच्या ३६ पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंबाजोगाई. वतीने सामाजिक बांधिलकी या उपक्रमांतर्गत शनिवारी कृतज्ञता व जीवनगौरव सोहळ्याचे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते गायक सुभाष शेप यांचा होणार गौरव होणार आहे. अशी माहिती आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड.सुनिल सौंदरमल यांनी दिली आहे.
सामाजिक उपक्रम व आर्थिक साक्षरता अभियाना अंतर्गत आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंबाजोगाई. वतीने कृतज्ञता व जीवनगौरव सोहळा शनिवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी अंबाजोगाई येथील अजिंठा हॉल, आधार भवन, दुसरा मजला, राजा बन्सीलाल नगर, दामा हॉस्पिटलच्या शेजारी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कल्पक व लोकाभिमुख गायक सुभाष शेप यांचा गौरव पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने (माजी संचालक संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर चौसाळकर (सचिव, योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई.) हे असणार आहेत. यावेळी विचारमंचावर दीपकजी वजाळे (उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई.) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर विशेष निमंत्रित म्हणून पंडित उद्धवबापू आपेगांवकर
(प्रसिद्ध पखावज वादक, अंबाजोगाई.), प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक, अंबाजोगाई.), अशोकराव गुंजाळ (ज्येष्ठ संपादक, सांज पाखरू अंबाजोगाई.), हे उपस्थित राहणार आहेत. तरी या सन्मान सोहळ्याला अंबाजोगाईकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड.सुनिल सौंदरमल, मार्गदर्शक प्रा.डी.जी.धाकडे, ऍड.किशोर गिरवलकर (अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती.), विजय राऊत (मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि गोविंद आकुसकर (शाखा अधिकारी, अंबाजोगाई) यांनी केले आहे.
=======================
