केज (प्रतिनिधी )- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या जिल्हा नियोजन मधुन बनसारोळा ता.केज येथे होत असलेली शाळा खोली चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने याची चौकशी करण्यात यावी व बिल अदा करू नये या मागणीसाठी आज स्वातंत्र दिनी शालेय समिती व ग्रामस्थ आज पासुन आमरण उपोषणाला बसले आहेत
या विषयी निवेदनात म्हटले शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातुन बनसारोळा ता. केज जि.बीड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत 10 लाख रुपयाचे एक खोलीचे काम चालू आहे. सदरील काम इस्टीमेट व प्लॅनप्रमाणे करणे अपेक्षित असताना देखील सदरील काम निकृष्ठ दर्जाचे चालू आहे. याबाबत गावकरी व शालेय समिती यांनी गुत्तेदार व इंजिनिअर यांना वेळावेळी सर्वांनी सांगुनही ते काम तसेच चालू आहे. सर्व जातीधर्माचे मुले शाळेत शिक्षण घेत आहेत तेथे काम चांगल्याप्रकारे करावे पण गावकरी व शालेय समिती यांना न गुमानता गुत्तेदार व इंजिनिअर हे आपली मनमानी करत आहेत ,शेवटी गावकरी व शालेय समिती यांनी ग्रा.पं. कार्यालयाला याची माहिती दिली असता ग्रामसेवक व सरपंच यांनी त्या शालेय समितीच्या व गावकऱ्यांच्या अर्जाला केराचे टोपली दाखवली आहे. त्यांनी त्यांच्यावर काहीचे कार्यवाही केली नाही. आपणास विनंती की सदरील काम निकृष्ठ दर्जाचे आहे. इस्टीमेट प्रमाणे प्लॅनप्रमाणे पण सदरील काम होत नाही. ते काम तात्काळ बंद करून त्यांचे कसल्याही प्रकारचे बील काढू नये ते काम आपण इस्टीमेट प्रमाणे करून घ्यावे गावकरी व शालेय समितीची आपणास विनंती, तसे नाही झाले तर शालेय समिती व गावकरी मिळून ग्रा.पं. कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याच इशारा 15 दिवसांपूर्वीच दिला होता दरम्यान या कामात जिल्हा प्रमुख भागीदार असल्याची चर्चा होत आहे,या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
