आ.नमिताताई मुंदडा यांना होमगार्ड्सचे साकडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
होमगार्ड्सची ड्युटी ही स्थायी नसल्याने त्यांना वर्षातून जेमतेम ५० दिवसांचा ही रोजगार मिळत नाही. त्यामुळे होमगार्ड्सची रोजगारासंबंधी परिस्थिती ही अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळे यापुर्वीही २०१९ साली मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी १८० दिवस होमगार्ड्सना रोजगार मिळण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी व याप्रकरणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी पाठपुरावा करून होमगार्ड्स विषयीचा हा प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती व मागणी करून होमगार्ड्स बांधवांनी शुक्रवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आ.नमिताताई मुंदडा यांना दिलेल्या निवेदनातून साकडे घातले आहे.
होमगार्ड्स बांधवांनी शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आ.नमिताताई मुंदडा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात सध्या जवळपास ३९२०८ इतके होमगार्ड्स बांधव कार्यरत आहेत. सदर होमगार्ड्सना फक्त सणासुदीच्या काळात, निवडणुका तसेच क्वचित इतर वेळेस कामास लावले जाते व त्यांना फक्त त्याच दिवसाचा रोजगार दिला जातो. अशा प्रकारे त्यांना वर्षातून जेमतेम ५० दिवसांचाही रोजगार मिळत नाही. सदर होमगार्ड्सना रोजगाराची कुठलीही हमी नसते त्यामुळे होमगार्ड्सना इतर दुसरा कुठला तरी रोजगार शोधावा लागतो. आपल्या महाराष्ट्रात विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था मध्ये कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान ११ महिन्यांचा रोजगार दिला जातो. परंतु, होमगार्ड्सना मात्र वर्षांतून जेमतेम ५० दिवसांचा रोजगार मिळणे ही अवघड आहे. तसेच सदर होमगार्ड्सनां उपजिविका भागविण्यासाठी इतर कुठला तरी व्यवसाय करीत असताना ड्युटीवर हजर राहण्याबाबत सांगितले तर ते करीत असलेला सदर व्यवसाय / रोजगार सोडून तात्काळ ड्युटीवर हजर राहावे लागते. परंतु, होमगार्ड्सची ड्युटी ही स्थायी नाही. यापूर्वी युती सरकार असताना ना.देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असतानां सन २०१९ मध्ये होमगार्ड्सना दोन महिन्यांच्या खंडानंतर दोन महिने काम असे जवळपास १८० दिवस रोजगार मिळावा यासाठी अतिशय चांगला निर्णय घेतलेला होता. परंतु, होम गार्डसच्या प्रश्नानंतर बाबत ना.फडणवीस यांनी दिनांक २१ जुलै २०२३ रोजी होमगार्ड्सना सहा महिने काम व तीन वर्षांनी केलेली जाणारी नोंद बंद याबाबत घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने ही अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तरी याप्रश्नी आमदार नमिताताईंनी महाराष्ट्रातील होमगार्ड्स यांच्या रोजगारासंबंधी वरील परिस्थितीचे अवलोकन करावे तसेच होमगार्ड्सची परिस्थिती अतिशय गंभीर असून होमगार्डसना सहा महिने काम व तीन वर्षांनी केली जाणारी नोंदणी बंद याबाबत घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचा महाराष्ट्रातील होमगार्डस यांचा प्रश्न मार्गी लावावा व याबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा, कार्यवाही व शिफारस करावी येत्या हिवाळी अधिवेशानात सदरील प्रश्न विधानसभेत मांडवा अशी नम्र विनंती या निवेदनातून सर्व होमगार्ड्स बांधवांनी केली आहे. सदरील निवेदनावर अहमद करीम पप्पुवाले, एस.एम.शेख, आर.के.कदम, बी.पी.धायगुडे, पी.एस.माने, यु.टी.जाधव, एम.एस.नागराळे, श्री.यु.लोंढे, एम.व्ही.घनघाव, जि.जे.झिरमिळे, एम.व्ही.पांचाळ, एम.के.शेख, एम.बी.शेख, डि.डी.वैद्य, बी.एच.कदम, एस.डब्ल्यू.घुले, एस.एम.इतापे, डी.व्ही.खोसे, सि.डी.राठोड, डि.जी.वाघमारे, भिका बद्रोद्दीन गवळी, आर.एम. गवळी, आर.एम.इंगळे, एल.जी.लाटे, एस.जी.रोडे, डि.यु.जोगदंड, एम.बी.शेख, आर.के.साळवे, बी.एम.कोल्हापुरे, पि.एम.वाघमारे, एन.बी.शेख, जे.के.सय्यद, एम.एम.शेख आदींसह अनेक होमगार्ड्स बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रश्नी होमगार्ड्स बांधवांचा प्रश्न आणि मागणी समजून घेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करून प्रयत्नशील राहूत असा सकारात्मक प्रतिसाद आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदन देणाऱ्या सर्व होमगार्ड्स बांधवांना दिला. यावेळी अहमद करीम पप्पुवाले (माजी शहराध्यक्ष, युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी) आणि रजिया अहमद पप्पुवाले (मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा.) यांची उपस्थिती होती.
=======================
