१० वी व १२ वीचे गुणवंत व एमबीबीएससाठी पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
श्री.व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बीडचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संपन्न झाले. यावेळी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारसह उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमात संस्थेच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारे गुणवंत आणि एमबीबीएस साठी पात्र विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभाग, बीडचे माजी शिक्षण अधिकारी भास्करराव देवगुडे हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री तिरूपती शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बप्पासाहेब जाधव पाटील हे होते. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद, बीडचे उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे, संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश जाधव पाटील, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, भगवान चाटे, श्री.वाघ सर, श्री.देशमुख सर, श्री.खोडवे सर, श्री.दुबाले सर, प्राचार्य आर.एम.हावळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक एस.एस.धुमाळ व नागरगोजे मॅडम, नारायण वर्ल्ड स्कूलच्या प्राचार्य श्रीमती अनुजा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बारावी नंतर एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारसह उत्कृष्ट सादरीकरण केले. यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोकगीत, लावणी, कोळीगीत व इतर विविध लोकप्रिय गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या सादरीकरणास उपस्थित मान्यवर आणि पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बीडचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
=======================
