नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
अंबेजोगाई :
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसऱ्या सोमवारी करण्यात येत असते. येत्या सोमवारी दि.१२ ऑगस्ट रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली
करण्यात आले आहे.
अर्जाची पध्दत
- अर्ज विहीत नमुन्यात असावा. (प्रपत्र)
- तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी.
- चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस
आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. - तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त
लोकशाही दिनात अर्ज करता येईल. - जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय
आयुक्त लोकशाही दिनात. - विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज
करता येईल.
कोणत्या विषयावरील अर्ज स्वीकारले जात नाहीत. - न्याप्रविष्ठ प्रकरणे
- राजस्व / अपिल्स
- सेवाविषयक आस्थापना विषयकबाबी
- विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच
जोडलेले अर्ज. - अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे, अशाप्रकरणी पुन्हा
संदर्भात केलेले अर्ज
तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर.
वरिल प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत
असे संबधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी ८ दिवसांत पाठविण्यात येतात
व त्यांची प्रत अर्जदारास पृष्टांकीत करण्यात येते.
- लोकशाही दिन केव्हा होणार नाही.
ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकी करिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली
आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनांचे आयोजन करण्यात येत
नाही. - विधिमंडळ अधिवेशन काळात मंत्रालय स्तरावरील “लोकशाही दिन” होणार
नाही.
अर्ज करण्यासाठी लागणारे प्रपत्र पुढीलप्रमाणे : - प्रपत्र- १ (अ) लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना
- प्रपत्र – १ (ब) जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज सादर
करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे. - प्रपत्र १ (क) विभागीय आयुक्त लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना व
आवश्यक कागदपत्रे. - प्रपत्र १ (ड) मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे.