अंबाजोगाई (प्रतिनिध) स्वामी सर्व्हिसेस व नगर परिषद अंबाजोगाई यांच्यात स्वच्छतेच्या कामाचा करार झालेला होता. तरी कंपनी मार्फत रोजंदारी कर्मचारी यांची नियुक्ती अंबाजोगाई शहर स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेमध्ये केली होती. कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी जमा केलेला नाही व माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेबर व चालु ऑक्टोबर चा पगार अद्यापपर्यंत दिलेला नाही. सदर कंपनीस कार्यालय विचारणा केली असता कंपनीचे म्हणणे असे आहे की, अंबाजोगाई नगर परिषदेने कंपनीचे बिल अदा केलेले नाही. त्यामुळे तुमचा भविष्य निर्वाह निधी व पगार कंपनीने थकीत केलेला आहे.
ऐन दिवाळीच्या सणासुदीत देखिल कंत्राटदाराने आमचा पगार न दिल्यामुळे आमची दिवाळी अंधारात गेलेली आहे. आमच्या कुटुंबाची मानसिक खच्चीकरण झालेले आहे. याचे जबाबदार नगर परिषद प्रशासन आहे. निषेन म्हणून आम्ही कर्मचार्यांनी काळी दिवाळी साजरी केली. आमच्या खालील मागण्या पुर्ण करण्यात याव्यात अन्यथा आम्ही प्रहार कामगार संघटनेचे वतीने सर्व कर्मचारी महिला व पुरुष येणार्या सोमवार पासून आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषणास करी आहोत. तरी आपण याची गंभिर्यपूर्वक दखल घ्यावी व स्वामी सर्व्हिसेसचे कंत्राटदार जे कोणी असेल त्याला सोमवारी आपल्या कार्यालयामध्ये बोलावून व आमचे मागण्याचा तात्काळ न्याय निवडा करावा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालया समोर उपोषणास आता बसलेलो आहोत व आमच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत बसणार आहोत. यापुर्वीसुध्दा आपणास वेळोवेळी लेखी निवेदने देवून पाठपुरावा केलेला आहे. असे अशयाचे निवेदन आम्ही आपणास दिलेले होते. परंतु आमच्या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आम्हास हा निर्णय घ्यावा लागला आहे. संबंधीत कंत्राटदार व मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आम्हांला चुकीचे दिशाभुल करणारे पत्र देवून कळविले आहे की, कंत्राटी सफाई कामगाराचे जुलै 2025 पर्यंतचे देयके अदा केलेले आहे संबंधीत कैत्राटदाराने आम्हांला आजपावेतो कसलेही वेतन अदा केलेले नाही व भविष्य निर्वाहनिधी सुध्दा अदा केलेला नाही. मग यात चुक कोणाची काय गोडबंगाल आहे याचा बोध होत नाही. तरी या बाबत सखोल चौकशी करुन संबंधीत कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट / काळ्या यादीत टाकून कायदेशिर कार्यवाही करण्यात व नगर परिषद अंबाजोगाई यांना आदेशित करण्यात यावे की, संबंधीत कंत्राटदाराच्या डिपॉझिट मधून कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे देयके अदा करण्यात यावेत. अशी मागणी सर्व कर्मचारी वृदांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकार्यांना निवेदन दिलेले आहे. तरी आपण लवकरात लवकर या बाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही अत्यावश्यक सेवा बंद पाडली आहे. ते सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदार व मुख्याधिकारी यांची आहे. आमच्यावर कसल्या प्रकारची कारवाई करू नये. याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्यावर राहिल असे निवेदनात नमुद केलेले आहे.
या निवेदनावर अतुल उघडे, क्लीखान पठाण, ज्ञानेश्वर जोगदंड, विजय ओव्हाळ, प्रदिप घनघाव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
