मुंबई, प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सुमननगर चेंबूर मुंबई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समितीच्या वतीने समाजभूषण सुदाम आवाडे , पार्वती आवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. तुकाराम काते, सुदाम आवाडे, पार्वती आवाडे, समिती सचिव रवींद्र पवार, समाजमाता कुसूमताई गोपले, कॉ. प्रकाश रेड्डी, वसंत तुपसुंदर, विशाल तुपसुंदर, योगेश शिंदे, सुनीता तुपसुंदर, अश्विनी शिंदे, शोभा लोंढे, सविता दासरे, रवींद्र खलसे, मुकेश पाखरे, श्रावण नाटकर सर, संजू साठे, दत्ता त्रेय आवाडे, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
