अंबाजोगाई(प्रतिनिधी)
भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.नेमका हाच संदेश वापरून योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी निसर्ग संवर्धन मंडळातंर्गत प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. वसतीगृहाचे ग्रहपाल, शिक्षिका यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सर्वत्र होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली .यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखुन या विद्यार्थीनी राखीपौर्णिमेनिमीत्त परिसरातील वृक्षांना वृक्षरक्षा बंधन करण्यात आले . सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षिततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केला. रक्षाबंधनासाठी विद्यार्थींनींनी पर्यावरणाला हानीकारक असणाऱ्या घटकांना वगळुन वृक्ष रक्षाबंधन केले.
या प्रसंगी निसर्ग संवर्धन मंडळ,योगेश्वरी विद्यार्थी वसतीगृह यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
