
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील योगेश्वरी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.वैष्णवी उदयकुमार दिक्षित हिने NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) JEE परीक्षेत पंचेवीसवा AIR (All India Rank) प्राप्त करून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. योगेश्वरी महाविद्यालयातून २०२० या वर्षी बारावी उत्तीर्ण होऊन तीने NDMVP कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक येथून बी. फार्मसी पूर्ण केले. या वर्षी झालेल्या विविध परीक्षेत यश मिळवताना ती GATE परीक्षा उत्तीर्ण होऊन आय आय टी गांधीनगर (गुजरात) येथील M.Tech. Biological engineering साठी पात्र ठरली आहे. M.Pharm.साठी आवश्यक असलेली GPAT तसेच M.Tech प्रवेशासाठी GATB परिक्षा पण ती उत्तीर्ण झाली आहे. NIPER JEE परीक्षा उत्तीर्ण होऊन तीने अहमदाबाद येथे MS pharmaceutics करण्याचे ठरवले असून औषधशास्त्र यात संशोधन करण्याचा तिचा मानस आहे.
दरम्यान वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही हतबल न होता जिद्दीने तिने मिळवलेल्या या यशाबद्दल योगेश्वरी महाविद्यालयात तिचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तिने योगेश्वरी महाविद्यालयात माझ्या यशाचा पाया रचला गेला अशी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते. तिच्या यशाबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर,सचिव कमलाकर चौसाळकर, पदाधिकारी जी.बी. व्यास,ऍड.जगदीश चौसाळकर,डॉ.शैलेश वैद्य,भीमाशंकर शेटे,प्रा. अभिजीत लोहिया आदीसह इतर संचालक व इतरांनी अभिनंदन केले आहे.